पाठ २८) मोरपिसारा
प्रश्न-१) चिचुला काय काय करावं वाटायचं?
उत्तर- चिचुला पक्ष्यांसारखे
उडावसं वाटायचे,सश्यासारख्या उड्या मारायला तसेच बदकासारखा गोरा रंग हवा होता.
प्रश्न-२) का ते सांग.
आ) परी झाडाच्या मागे
लपून बसली.
उत्तर- चिचू उंदराची गंमत
पाहण्यासाठी परी झाडाच्या मागे लपून राहिली.
आ) चिचू पळत रामुकडे
निघाला ?
उत्तर- रामूला आपल्या स्वत:च्या (चिचूच्या) मनातील पक्षी,ससा व बदक
बनण्याची इच्छा कशी पूर्ण करता येईल हे विचारण्यासाठी चिचू पळत रामूकडे निघाला.
इ) चिचूची इच्छा ऐकून
रामू हसू लागला.
उत्तर- चिचुला मोरासारखा
पिसारा हवा होता,त्याची ही इच्छा ऐकून रामू हसू लागला.
ई) चिचू बिळाच्या बाहेरच झोपला.
उत्तर- चिचुला पिसारा मिटवता
येत नव्हता त्यामुळे त्याला बिळात जाता आले नाही,म्हणून त्याला
बिळाच्या बाहेर झोपावे लागले.
प्रश्न-३) चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली,असे तुला वाटते काय?कारणासह सांग.
उत्तर- चिचुला पिसारा मिटवता
येत नव्हता त्यामुळे त्याला बिळात जाता आले नाही,म्हणून त्याला
बिळाच्या बाहेर झोपावे लागले.रात्रभर आईपासून लांब राहावे लागले.
प्रश्न-३) कोण काय करते ते लिही.
अ) ससा - टूणटूण उड्या मारतो.
आ) पक्षी - हवेत उडतात.
इ) बदक - पाण्यात पोहतो.
ई) उंदीर - वस्तू कुरतडतो.
उ) हत्ती - सोंडेने झाडाचा पाला खातो.
Post a Comment
We will respond you soon...Thanks